ग्रीन बॉक्स उदघाटन

July 10, 2021

आज भांडारकर इन्स्टिट्यूट येथे फुटबॉल सराव टर्फ, क्रिकेट सराव टर्फ, ग्राऊंड चे उद्घाटन केले. यामुळे या परिसरातील खेळप्रेमींना सराव करण्यासाठी माध्यम तयार झाले आहे. मनुष्याला रोगांपासून दूर राहण्यासाठी निरोगी शरीर असणे आवश्यक आहे. एका निरोगी शरीरातूनच निरोगी मन व बुद्धीचा विकास होतो. शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळांचे भरपूर महत्त्व आहे. खेळांमुळे शरीर व मन दोघेही निरोगी राहतात. खेळ खेळल्याने धैर्य, सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होतो. खेळ आजच्या व्यस्त जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणून प्रत्येकाने दिवसातून थोडा वेळ काढून खेळायलाच हवे.यावेळी श्री. भूपाल पटवर्धन (कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष), श्री. राहुल सोलापूरकर (विश्वस्त), श्री. सुधीर वैश्यंपायन (सचिव), श्री. पांडुरंग बलकवडे (जेष्ट इतिहास संशोधक), श्री. रविजी साळेगावकर (अध्यक्ष भाजपा शिवाजीनगर), श्री. गणेश बगाडे (सरचिटणीस भाजपा शिवाजीनगर), श्री. ऋषिकेश बारावकर (उद्योजक) आदि उपस्थित होते.

Add your gallery here