1-oct-3

श्री विश्वविनायक पुरस्कार सोहळा २०१६

October 1, 2016

श्री अटल सेवा प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या श्री विश्वविनायक पुरस्कार सोहळा २०१६ येथे प्रमुख अतिथी म्हणून जाण्याचा योग आला. भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक व युवा नेते श्री. मनिष साळुंके यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात गणेशोत्सवात सामाजिक काम करणाऱ्या मंडळांचे अध्यक्ष, पोलीस अधिकारी, सफाई कर्मचारी, महावितरण कर्मचारी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठानच्या वतीने श्री विश्वविनायक पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशा प्रकारच्या उपक्रमांनी समाजामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते. मी श्री. मनीष साळुंके यांचे अभिनंदन करतो व त्यांच्या भावी सामाजिक व राजकीय कारकीर्दीस शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून समाजाची अशीच सेवा निरंतर व्हावी ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
जय हिंद