22-august-1

सांसद तिरंगा यात्रा

August 22, 2016

!! सांसद तिरंगा यात्रा !!
काल दि. २१ ऑगस्ट रोजी हजारो युवकांनी खासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या तिरंगा सन्मानया दुचाकी रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. महात्मा फुले वाडा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास वंदन करून ही भव्य रॅली मंडईतील टिळक पुतळा येथे संपन्न झाली. भारतमाता की जय ची घोषणा देणाऱ्या पुणेकरांनी या रॅलीमध्ये त्यांचा जीव ओतून दिला. शेकडो राष्ट्रध्वज व अनेक देशभक्तीपर गीतांमुळे रॅलीतील उर्जा उंचावली.
देशभरात आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तिरंगा सन्मान यात्रा मोठ्या प्रमाणात आयोजित कराव्या असे आवाहन सर्व खासदारांना केले होते.
राष्ट्रहिता साठी कार्यरत खा अनिल शिरोळे
या रॉली मधील काही अस्मरणीय क्षण .
एहसास थोडा तो जगाए अपने दिलोंमें हम,
क्या नाम है अपना जहॉ में खडे है कहाँ पे हम !
है हमें जाना कहाँ और चले है कहाँ पे हम !
हमसे पुछे है ये बात रे वतन!
एक नई सुबह जगाए अरे इंतजार है जहॉ को !
!!
वंदेमातरम् !!