CNG कुपन व धान्य किट वाटप

July 9, 2021

भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, थोर विचारवंत, कुशल संघटक, स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिवाजीनगर मतदार संघातील रिक्षाचालक यांना सी.एन.जी भरण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे प्रत्येक रिक्षा चालकास 500 रुपयांची सी.एन.जी भरण्यासाठी कुपन वाटपाचा कार्यक्रम आज पार पडला.कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यभर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतून रिक्षा वाहतुकीला वगळण्यात आले असले तरीही, प्रवासीच नसल्यामुळे रिक्षाचालक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न रिक्षाचालकांसमोर पडला आहे. यासाठी त्यांना हातभार लावावा या प्रामाणिक हेतुने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे (सरचिटणीस पुणे शहर), मा. राजशे येनपुरे (सरचिटणीस पुणे शहर), नगरसेवक आदित्य माळवे, नगरसेविका राजश्रीताई काळे, योगेश बाचल (उपाध्यक्ष पुणे शहर), गणेश बगाडे (सरचिटणीस शिवाजीनगर), अपर्णाताई गोसावी (अध्यक्ष शिवाजीनगर महिला आघाडी), मिलिंद टकले (उपाध्यक्ष शिवाजीनगर), किरण ओरसे (संपर्क प्रमुख), लक्ष्मण नलावडे (अध्यक्ष प्रभाग ७), संजय चोरगे (चिटणीस बांधकाम व्यवसायिक कामगार संरक्षण आघाडी), रामू धोत्रे तसेच शिवाजीनगर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Add your gallery here