आज भारतीय जनता पार्टी महराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा नागरिकांना एक हात मदतीचा द्यावा असे आवाहन आदरणीय दादांनी सर्व पुणेकरांना केले आहे.
June 10, 2021पार्टी नहीं, परिवार है…संस्था नहीं, संस्कार है !आज भारतीय जनता पार्टी महराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा नागरिकांना एक हात मदतीचा द्यावा असे आवाहन आदरणीय दादांनी सर्व पुणेकरांना केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत आज शिवाजीनगर मधील सर्व माननीय नगरसेवक सर्व शहर पदाधिकारी सर्व शिवाजीनगरमधील कार्यकर्ते बंधू आणि भगिनी यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून धनादेशाच्या द्वारे जी मदत केली ती ३ लाख ४७ हजार रुपये झाली. आपण सर्वांनी अतिशय मोलाचे योगदान शिवाजीनगर मतदारसंघात दिल्यामुळे आपण हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो आपल्याला मनापासून धन्यवाद.‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाचा हेतू पुणे शहरातील नागरिक जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा नागरिकांना अन्नधान्य कीट वाटप, रिक्षावाले काकांना मोफत CNG कुपन, मोफत लसीकरण अशी मदत या उपक्रमातून नागरिकांना होणार आहे. एक आदर्श नेता कसा असावा हे दादांच्या कार्यशैलीतून स्पष्ट होते. माझ्या वाढदिवसाला कोणत्याही कार्यकर्त्याने बॅनरबाजी करू नये, त्याऐवजी समाजातील वंचित लोकांना मदत करावी अशी विनंती दादांनी कार्यकर्त्यांना केली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या दादांनी विद्यार्थी परिषदेपासून आपल्या समाजकार्याची सुरुवात केली. विद्यार्थी परिषदेत असताना त्यांची संघटनात्मक बांधणी त्यांच्यातील गुणवैशिष्ट्य हेरून भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दादांवर विश्वास दाखवला. सन २००४ मध्ये दादांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाली. सन २००९ व सन २०१४ मध्ये पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने ते विजयी होऊन विधान परिषदेत प्रवेश केला.सन २०१४ च्या विधान सभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत, सरकार स्थापन केले. मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात दादांकडे सहकार, पणन, सार्वजानिक बांधकाम आदी विभागाची सूत्रे सोपवण्यात आली. जुलै २०१९ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाली. तसेच २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकी मध्ये कोथरूड मतदार संघामधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.विद्यार्थी परिषद ते भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हा प्रवास खूपच खडतर असावा परंतु आपण न डगमगता संघर्ष करत देशसेवेचे, भारतीय जनता पक्षाचे अविरत कार्य आपल्या हातून घडले, घडत आहे व यापुढेही असेच घडत राहो अशी ईश्वरास प्रार्थना करतो व आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
Add your gallery here