औंध क्षेत्रीय कार्यालयाचे वार्ड ऑफिसर यांची भेट
August 17, 2021आज औंधगाव कोळीवाडा येथील मत्स्यविक्रेते बांधवांच्या समस्येबाबत औंध क्षेत्रीय कार्यालयाचे वार्ड ऑफिसर यांची भेट घेतली.गेली अनेक वर्ष कोळी बांधव राजीव गांधी ब्रिज च्या जवळ मत्स्यविक्री करीत आहेत. हे औंध चे स्थानिक ग्रामस्थ असून मुळा नदीत मासेमारी करणे आणि मासेविक्री करणे हा परंपरागत पिढीजात व्यवसाय करतात. या व्यावसायीकांना पुणे मनपा कडून व्यवसायीक जागेचा कर लावला जात आहे, परंतु त्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत व पुलाच्या कडेला नदी पात्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर बसून हे कोळी बांधव व्यवसाय करतात. त्यांना ओटा , शेड , पाण्याचे नळ , आणि सर्वात महत्वाचे स्वच्छता या सोयी याठिकाणी उपलब्ध व्हायला हव्यात असे निवेदन मागच्या महिन्यात मला औंधचे भाजपा कार्यकर्ते गणेश कलापुरे आणि या कोळी बांधवांनी दिले होते. त्याप्रमाणे आज औंध क्षेत्रीय कार्यालयाचे वार्ड ऑफिसर यांची भेट घेतली व त्यांच्या समस्या सोडविणेबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यास सांगितले.यावेळी मा. नगरसेवक बाळासाहेब रानवडे, भाज पा कार्यकर्ते गणेश कलापुरे, सुप्रीम चोंधे, नितीन बहिरट व औंध येथील कोळी बांधव उपस्थित होते.
Add your gallery here