कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज बैठक पार पडली.
July 2, 2021कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी आज खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) इनडोअर स्पोर्ट्स सुविधांना सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी द्यावी.२) कॉलेज मधील शिक्षण लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे कॉलेज मधील विद्यार्थ्यांना लस देण्यास प्राधान्य द्यावे व शिक्षण सुरू करावे. यासाठी पेड लसीकरण वापरले तरी चालू शकते. कर्नाटक सरकार ने असा निर्णय घेतला आहे. विशेषतः ज्या अभ्यासक्रमांना प्रॅक्टिकल करणे, लॅब मध्ये येणे अत्यावश्यक आहे. त्या कोर्स, कॉलेज ना प्राधान्य द्यावे.३) कोविडची साथ, टाळेबंदी अशा कारणाने सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसायाला गेले सव्वा वर्ष आर्थिक तडाखा बसला आहे. हे उद्योग सावरण्यासाठी शासकीय मदतीची अत्यंत गरज आहे. तरी महावितरण चे कर्मचारी अधिकारी जेव्हा वीजबिल वसुली साठी जातील तेव्हा त्यांनी सक्तीने वसुली करून नये व व्यावसायिकांना बिलाचे हफ्ते करून द्यावेत जेणेकरून त्यांना वीजबिल भरणे सोपे जाईल.४) कोरोनाच्या False Positivity Report वरती प्रशासनाने नजर ठेवून ज्या लॅब चुकीचे अहवाल देत असतील अशा लॅबवर प्रशासनाने कडक कारवाई करावी.५) ज्या प्रमाणे शहरांमध्ये मायक्रो कॅन्टोन्मेंट झोन केले आहेत त्याच प्रमाणे पुणे ग्रामीण एकत्रित न करता तालुका निहाय वर्गवारी केल्यास व्यावसायिकांना व्यवसाय करणे सोपे जाईल आणि ज्या तालुक्याचा positivity rate जास्त आहे त्याला लेवल 1 ते 5 मधील निर्बंध लागू केल्यास प्रशासनाला पण काम करणे सोपे जाईल.
Add your gallery here