कोरोना – १९ बैठक
January 22, 2022कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) ज्या नागरिकांचे व खेळाडूंचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत अशा नागरिकांसाठी जलतरण तलाव (स्विमिंग पूल) सुरु करावेत.२) ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत अशा नागरिकांसाठी पार्क सुरु करावेत. सदरील मागणीला बैठकीत मंजुरी मिळाली असून सकाळी पार्क सुरु करण्याचा निर्णय झाला आहे.३) खुली मैदाने सुरु की बंद याबाबतीत प्रशासनामध्ये संभ्रम दिसत होता. यावर खुली मैदाने सुरूच राहतील असे प्रशासनाने सांगितले. ४) दि. २२ मे २०२० पासून कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी ज्या बैठका सातत्याने झाल्या व सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, डॉक्टर, पोलीस कर्मचारी, प्रशासन यांनी केलेले उल्लेखनीय कामाचे एक डॉक्युमेंशन बनवावे.
Add your gallery here