छत्रपती शिवाजी महाराज यांची पंचधातु मधील १२० किलोची मूर्ती श्री क्षेत्र रायरेश्वर येथे स्थापन करण्यासाठी नेण्यात येणार असून आज मुर्तीचा विधिवत अभिषेक करून, ती मुर्ती श्री रायरेश्वर येथील ग्रामस्थ यांना अर्पण करण्याचा सुवर्ण सोहळा आज श्री रोकडोबा मंदिर येथे संपन्न झाला

January 7, 2022

।।जय गुरू।।श्री छत्रपती शिवाजीनगर गावठाण (भांबुर्डे) यांच्या संकल्पनेतून साकारलेली श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पंचधातु मधील १२० किलोची मूर्ती श्री क्षेत्र रायरेश्वर येथे स्थापन करण्यासाठी नेण्यात येणार असून आज मुर्तीचा विधिवत अभिषेक करून, ती मुर्ती श्री रायरेश्वर येथील ग्रामस्थ यांना अर्पण करण्याचा सुवर्ण सोहळा आज श्री रोकडोबा मंदिर येथे संपन्न झाला. या मंगल प्रसंग सोहळ्यात मला सहभागी होता आले, याचा मला खूप आनंद व अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रशासन व्यवस्था आणि कार्यपद्धती अतिशय प्रभावशाली होती. राजकारण आणि समाजकारण यांचा योग्य मेळ घालून महाराजांनी कृतीशील व्यवस्थापन स्वराज्यामध्ये लागू केलं होतं. महाराज प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटले. ते खरे तर आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेचे प्रणेतेच होते. स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवून प्रजेचे सर्व मनोरथ त्यांनी पूर्ण केले.अखंड परीश्रम, दगदग यांचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत होताच. तरीही त्याची तमा न बाळगता ते शेवटपर्यंत कार्यरत होते. साडेतीनशे वर्षाच्या गुलामगीरीच्या बंधनातुन मुक्त करून हिंदवी स्वराज्यात सुख आणि शांतीने जगण्याचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराज यांनी अथक परीश्रम करून जनतेला दिला. अशा या महान योध्याला माझे कोटी कोटी नमन…!जय जिजाऊ, जय शिवराय…!

Add your gallery here