जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन
February 19, 2022आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे त्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे, अशी अनेक जनसेवेची कामे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून होत असतात. नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी एक हक्कच असं ठिकाण म्हणजे जनसंपर्क कार्यालय होय. भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख मा.श्री. किरण ओरसे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या भागातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय काम करेल असा मला विश्वास आहे. यावेळी नगरसेविका ज्योत्स्नाताई एकबोटे, मा. योगेश बाचल, मा. मुकारी अलगुडे, तसेच स्थानिक नागरिक, भाजपाचे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
Add your gallery here