‘’जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’’

June 26, 2021

दरवर्षी २६ जून हा दिवस ‘’जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’’ म्हणून जगभर पाळला जातो. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत लोकांना माहिती मिळावी हा या दिनामागचा उद्देश आहे. या दिनाचे औचित्य साधून भाजपा पुणे शहर NGO आघाडी चे अध्यक्ष डॉ. अजयजी दुधाणे यांच्या माध्यमातून आज मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्स येथे अंमली पदार्थ सेवन व व्यसनाधिनता यावर चर्चासत्र व प्रतीकात्मक राक्षस दहन असा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये अमली पदार्थांच्या वाट्याला न जाता, आरोग्यरक्षण करण्यासाठी लोकांना प्रेरित केलं. अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली असणाऱ्या तरुणांना दिशादर्शन करणं आवश्यक आहे. या गर्तेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रथमतः त्यांच्या कुटुंबाने आणि व्यापक स्तरावर समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. आयुष्यावर प्रेम करा, अंमली पदार्थांवर नाही, हा विचार प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवला पाहिजे.आपले जीवन सुंदर आहे. ते एकदाच मिळत असते. अमली पदार्थांपासून दूर राहून आपले जीवन सुंदर बनवा. आरोग्याला महत्त्व द्या… व्यायाम करा…खेळ खेळा…पण अंमली पदार्थांना थारा देऊ नका !या कार्यक्रमप्रसंगी पुणे भाजपाच्या उपाध्यक्षा सौ. स्वरदाजी बापट, भाजपा पुणे शहर NGO आघाडी चे अध्यक्ष डॉ. अजयजी दुधाणे, श्री. दत्तुजी सोनार आदि उपस्थित होते.