डॉक्टर रूपातील देव

June 21, 2021

डॉक्टर रूपातील देव…एनआयओ’च्या संचालिका नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. जाई केळकर व त्यांच्या टीमने एक यशस्वी डोळ्यांची शस्त्रक्रिया करून जुनैद ला त्याचे नैसर्गिक डोळे परत मिळवून दिले, ही खूप मोठी गौरवाची बाब आहे. आज डॉ. जाई केळकर यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.वर्षभरापूर्वी जुनैद पुण्यातील ‘राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थे’त (एनआयओ) उपचारासाठी आला. एनआयओ’च्या संचालिका नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. जाई केळकर यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने जुनैदवर यशस्वी शस्त्रक्रिया करून जुनैदला त्याचे नैसर्गिक डोळे परत मिळवून दिले. अत्यंत गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया दोन तास सुरू होती. या शस्त्रक्रियेनंतर जुनैद त्याच्या आयुष्यात प्रथमच डोकं सरळ ठेऊन पुढे बघू शकला.जुनैदला गोठलेले डोळे (Frozen Eye) हा अत्यंत दुर्मिळ जन्मतः असलेला नेत्रदोष होता. जगभरात सुमारे दोन लाख ३० हजार जणांमध्ये एखाद्याला हा आजार होतो. यात दोन्ही डोळ्यांचे स्नायू स्थिर होतात. त्यामुळे जुनैदमध्ये दोन्ही डोळ्यांची नजर वेगवेगळ्या दिशांना होती. त्यामुळे तो सामान्य माणसांप्रमाणे सरळ बघू शकत नव्हता.आपण चालताना समोरचं सहज बघू शकतो. जुनैदला मात्र समोरचं बघण्यासाठी उजव्या खांद्यावर अक्षरशः डोकं टेकवावं लागायचं. अशा स्थितीत तो आयुष्याची तब्बल ३० वर्षे जगलेला. अर्थात त्याचा गंभीर परिणाम त्याच्या मानेवर आणि मणक्यावर झाला. त्याच्या या आजाराचं कारण होतं त्याचे ‘गोठलेले डोळे’ (Frozen Eye) या विकाराला वैद्यकीय परिभाषेत ‘कॉँन्जेनायटल फायब्रोसिस ऑफ द एक्स्ट्राओक्युलर मसल्स’ (सीएफईओएम) म्हटले जाते. या आजारात रुग्णाच्या डोळ्याची ठेवणं जन्मतः वेगळी असते. त्यामुळे ते इतर सामान्य माणसांप्रमाणे डोळ्यांची हालचाल करू शकत नाहीत. बहुतांश वेळा रुग्णांना समोर पाहण्याची मान आणि डोकं विशिष्ट कोनात वळवावे लागते. त्याच प्रकारे जुनैद आपलं डोकं उजव्या खांद्यावर टेकवून समोर बघत असे.डॉ. केळकर म्हणाल्या, ‘डोळ्याची हालचाल पूर्ववत करणे हा या शस्त्रक्रियेचा उद्देश नव्हता. किंबहुने ती अपेक्षाही ठेवली नव्हती. जुनैद ज्या ओझ्याखाली तीस वर्षे जगलाय त्याचे ते ओझे हलके करणे, हा शस्त्रक्रियेचा उद्देश होता.’ज्या प्रमाणे देशाचे सैनिक हे आपल्या देशाचे रक्षण करतात त्याच प्रमाणे डॉक्टर हे आपल्या आरोग्याचे रक्षण करतात. म्हणून आपल्या समाजात डॉक्टरांकडे आदराने पाहिजे जाते आणि त्यांना विशेष स्थान देखील आहे. डॉ. जाई केळकर व त्यांच्या टीमच्या कर्तुत्वाला सलाम !

Add your gallery here