धन्यवाद मा. राजनाथ जी…!
May 21, 2022धन्यवाद मा. राजनाथ जी…!आपल्या देशाचे संरक्षण मंत्री मा.ना.श्री. राजनाथ सिंह जी यांचे पुणे विमानतळावर स्वागत केले. तसेच जुन्या पुणे – मुंबई महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जागा संरक्षण मंत्रालयाने पुणे महापालिकेला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. तत्कालीन पुणे शहराचे खासदार मा.श्री. अनिलजी शिरोळे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मेट्रोचे काम व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील २.२ किलोमीटर लांबीच्या जुन्या पुणे – मुंबई महामार्गाचे रुंदीकरण करावे यासाठी सर्व पाठपुरवा संरक्षण मंत्रालयाबरोबर केला होता. तसेच पुणे शहराचे विद्यमान खासदार मा.श्री. गिरीशजी बापट यांना मी दिनांक ११.०५.२०२२ रोजी या विषयाबाबत पत्र लिहून पाठपुरावा केला होता. मा. भाऊंनी याचा संरक्षण मंत्री मा.ना.श्री. राजनाथ सिंह जी यांचेकडे यशस्वी पाठपुरावा करून जुन्या पुणे – मुंबई महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जागा पुणे महापालिकेला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी मा. राजनाथ सिंह जी व मा. भाऊंचे मनःपूर्वक आभार मानतो.या निर्णयामुळे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील हॅरिस ब्रिज ते खडकीदरम्यानच्या २.२ किलोमीटरच्या रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण मार्गी लागणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होईल असा विश्वास आहे.सदरील रस्ता रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी मी आजच पुणे मनपाचे आयुक्त मा. विक्रम कुमार यांना पत्रव्यवहार सुद्धा केला आहे.