परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरणाटल्या दोन डोस मधील कालावधीत सवलत द्यावी.
June 1, 2021परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरणाटल्या दोन डोस मधील कालावधीत सवलत द्यावी.
कोविड प्रतिबंधासाठी असलेल्या कोविशील्ड लसीच्या दोन डोसमध्ये ८४ दिवसांचे अंतर ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातून सवलत मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
उच्च शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी लवकरच परदेशात जाणार आहेत. लसीकरण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल असे परदेशातील बऱ्याच विद्यापीठांनी जाहीर केले आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यांनी प्रमाणित केलेली लसच विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे.
भारतात सध्या कोविशील्ड ही लस WHO मान्यताप्राप्त आहे. या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस दिला जाणार आहे. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी गैरसोयीचा असून तो कालावधी सहा आठवड्यांचा (४२ दिवसांचा) करावा. विद्यार्थ्यांसाठी ते सोयीचे होईल. या सवलतीच्या मागणीबाबतची कार्यवाही लवकरात लवकर व्हावी अशी विनंती मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. See Less
Add your gallery here