
पाच देशांतील तरुण उद्योजक, नेत्यांशी संवाद..
May 26, 2022पाच देशांतील तरुण उद्योजक, नेत्यांशी संवाद…!पेरू, घाना, ब्रुनेई, बांग्लादेश, नेपाळ आणि स्वीडन या देशांमधील तरुण राजकीय प्रतिनिधी आणि उद्योजक यांनी आज पुणे शहरास भेट दिली. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (इंडियन कौन्सिल फॅार कल्चरल रिलेशन्स) या उपक्रमांतर्गत त्यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी मी त्यांच्याशी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राच्या भेटीत संवाद साधला. यावेळी उद्योग, पर्यावरण, शेती आणि राजकीय व्यवस्था आदी विषयांवर त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी संस्थेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष श्री. भूपाल पटवर्धन, सचिव सुधीर वैशंपायन, रजिस्ट्रार श्रीनंद बापट, इंद्रनिल चितळे, सौरभ पटवर्धन, भाजपा शिवाजीनगर सरचिटणीस गणेश बगाडे, चिन्मय भांडारी आदी यावेळी उपस्थित होते.
Add your gallery here