पुणे जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समिती बैठक…!
May 28, 2022पुणे जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समिती बैठक…!आज पुणे जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीची बैठक मा.ना.श्री. अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले…१) माझ्या शिवाजीनगर मतदार संघामध्ये बरेच डीपी नादुरुस्त व फॉल्टी आहेत. यामुळे बऱ्याचदा वीज पुरवठा खंडीत होत असून भर उन्हाळ्यात नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुख्यता घोले रोड , गोखलेनगर, औध गावठाण येथून बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी येत असतात. डीपी च्या समस्येमुळे नागरिकांच्या बऱ्याच इलेक्ट्रिक वस्तू खराब देखील झालेल्या आहेत. तरी माझ्या मतदार संघातील नादुरुस्त व फॉल्टी डीपी किती आहेत त्याचा शोध घेऊन ते दुरुस्त किंवा बदलून टाकावेत.२) सध्या वीज बिल न भरलेल्या ग्राहकांना कोणतीही सूचना न देता त्यांची वीज कापली जाते. यामध्ये नागरिकांना पूर्वसूचना देऊनच त्यांच्यावर कारवाई करावी.३) पुणे शहरामध्ये भूमिगत केबल टाकण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे जेणेकरून पावसाळ्यामध्ये वीज पुरवठा खंडीत होणार नाही. तसेच सर्व वस्ती भागामध्ये भूमिगत केबल टाकण्यात याव्यात. ४) वीज ग्राहकांना बनावट SMS पाठवून त्यांच्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर संपर्क साधण्यास सांगितले जाते. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगून वीजग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार पुणे शहरात पुन्हा वाढू लागलेले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई पोलीस प्रशासनाने करावी.
Add your gallery here