ब्रेमेन चौक येथे ट्राफिक पार्क चे उदघाटन
July 9, 2021शिवाजीनगर मतदारसंघामध्ये मुलांची वाहतूक पाठशाळा (Children’s Traffic Park) सुरु !पुणे महानगरपालिकेमार्फत ब्रेमेन चौक औंध या ठिकाणी मुलांची वाहतूक पाठशाळा प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व प्रदेशाध्यक्ष आमदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.सदर प्रकल्प अर्बन ९५ या संकल्पनेवर आधारित असून वय वर्षे १२ पर्यंतच्या संस्कारक्षम वयात मुलांना वाहतूक विषयक नियमाची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरचा प्रकल्प सुमारे १ एकर क्षेत्रामध्ये विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये १६० मीटर लांबीची रस्त्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व घटकांचा (मार्गिका, पदपथ, सायकल मार्ग, वाहतूक चिन्हे, वाहतूक विषयक फलक, पथदिवे) असा समवेश करण्यात आला आहे. तसेच खेळाच्या स्वरूपामध्ये विविध वाहतूक विषयक चिन्हे, फ्लोअर लेव्हलवर उमट रेखीव (Embossing) करण्यात आली आहेत. त्याचबरोबर सर्व वाहतूक विषयक चिन्हांचा मराठी व इंग्रजीमध्ये अर्थ समजण्यासाठी माहिती फलक लावण्यात आले आहेत. जेणेकरून या प्रकल्पामधून लहान मुलांना वाहतूक विषयक नियमांची माहिती देऊन त्याची काटेकोरपणे पालन करण्याची शिकवण देता येईल, त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच वाहतूक विषयक नियमांचे पालन केल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, अपघात कमी होऊन एक संस्कारक्षम पिढी घडविण्यास मदत होईल.यावेळी महापौर मुरलीआणणा मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, उपमहापौर सुनिताताई वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेवक प्रकाश ढोरे, नगरसेविका अर्चानाताई मुसळे,दत्ताभाऊ खाडे, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, गणेश घोष, दीपक पोते, संदीप लोणकर, शिवाजीनगर भाजपा अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, मधुकर मुसळे, मा. महापौर दत्तात्रय गायकवाड, व शिवाजीनगर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Add your gallery here