मार्च महिन्यात वडारवाडी-पांडवनगर भागात झालेल्या भीषण आगेत सुमारे ३०-३५ झोपड्या जळाल्या होत्या. सुदैवाने काही जिवीत हानी झाली नाही पण परिवारांनी त्यांची घरे गमावली.

August 20, 2020

मार्च महिन्यात वडारवाडी-पांडवनगर भागात झालेल्या भीषण आगेत सुमारे ३०-३५ झोपड्या जळाल्या होत्या. सुदैवाने काही जिवीत हानी झाली नाही पण परिवारांनी त्यांची घरे गमावली.
आज महापौर मुरलीधर मोहळ आणि राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे संघ चालक (गोखलेनगर) सुभाषजी कदम यांच्या उपस्थित ६ कुटुंबानला त्यांच्या घरांचे पुनर्वसन व हस्तांतर करण्यात आले.. येत्या काही आठवड्यात इतर कुटूंबियांनाही त्यांची पुनर्संचयित घरे दिली जातील.
यावेळी प्रांत प्रमुख श्री. बाळासाहेब जी दळवी, भा.ज.पा पुणे उपाध्यक्ष श्री. दत्ता खाडे, नगरसेविका स्वातीताई लोखंडे, नगरसेविका नीलिमाताई खाडे, नगरसेविका जोत्सनाताई एकबोटे, भा.ज.पा पुणे सरचिटणीस गणेश बगाडे,
संजयजी ऐडके, अनिल अलगुडे, युवा मोर्चा चिटणीस किरण ओरसे, राजेश धोत्रे,दत्ता घोगलू, सुनीताताई श्रीधर, निखिल विटकर तसेच सर्व स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते..
कार्यक्रमाचे संयोजक व घर बांधकाम पूर्ण होई पर्यंत प्रयत्न करणारे सागर धोत्रे, दयानंद इरकल,राम म्हेत्रे, परेश शिरसंगे यांचे हार्दिक अभिनंदन आणि विशेष आभार.