योग असे जेथे…आरोग्य वसे तेथे…21 जून

June 21, 2021

डॉक्टर रूपातील देव

योग असे जेथे…आरोग्य वसे तेथे…21 जून हा दिवस जगभर योग दिवस म्हणून साजरा केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी याबाबत 2014 साली युनोमध्ये प्रस्ताव मांडला होता. यातील 193 सदस्यांनी 21 जून हा दिवस योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असे घोषित केले. त्यानुसार आज योग दिवस साजरा केला जात आहे. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. आताच्या घडीला संपूर्ण जगावर करोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शक्य असलेल्या प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा असे आवाहन मी आज योग दिनानिमित्त सर्वांना करतो.

Add your gallery here