
रात का डब्बा या कल्याणी संभुस यांच्या उपक्रमात आजवर 11,000 हुन अधिक लोकांना रात्रीचं जेवण त्यांनी पुणे शहरात 4 ते 5 ठिकाणी देऊ केले.
June 10, 2021कोरोना काळात लोकडाऊन मध्ये भूक काय आहे याची अधिक तीव्र जाणीव माणसाला करून दिली. अनेक कोरोना योद्ध्यांनी लॉक डाउन काळात गरजूंना जेवण देण्याचे काम केले. दिवसा जेवण देणारे अनेक जण मी पाहिले पण रात्री जेवण देणारे कमी. रात का डब्बा या कल्याणी संभुस यांच्या उपक्रमात आजवर 11,000 हुन अधिक लोकांना रात्रीचं जेवण त्यांनी पुणे शहरात 4 ते 5 ठिकाणी देऊ केले. आज रात का डब्बा या उपक्रमामध्ये उपस्थित राहून स्वारगेट जवळील झोपडपट्टीमध्ये गरजूंना जेवणाचे वाटप केले हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि स्तुत्य आहे. मानवतेच्या या या राष्ट्रीय कर्तव्य च्या समर्पण भावनेतून करत असलेल्या कल्याणी व मिलन दर्डा यांच्या कामाला माझ्या हार्दिक शुभेच्छा..!!!