रिक्षा चालकास 500 रुपयांची सी.एन.जी भरण्यासाठी कुपन व स्कूल बस चालकांसाठी धान्य किट वाटप कार्यक्रम
July 2, 2021शिवाजीनगर मतदार संघातील रिक्षाचालक यांना सी.एन.जी भरण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे प्रत्येक रिक्षा चालकास 500 रुपयांची सी.एन.जी भरण्यासाठी व स्कूल बस चालकांसाठी धान्य किट वाटप कार्यक्रम आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यभर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतून रिक्षा वाहतुकीला वगळण्यात आले असले तरीही, प्रवासीच नसल्यामुळे रिक्षाचालक हैराण झाले आहेत. दिवसभर वणवण करूनही जेमतेम शंभर रुपये कमाईही होत नसल्याने रिक्षाचे हप्ते कसे फेडायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न रिक्षाचालकांसमोर पडला आहे. तशीच काहीसी अवस्था ही स्कूल बस चालकांवर सुद्धा आलेली आहे. यासाठी त्यांना हातभार लावावा या प्रामाणिक हेतुने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. भारतीय जनता पार्टी ही आपल्या संकट काळामध्ये सदैव आपल्या बरोबर होती, आहे, आणि यापुढेही राहील अशी ग्वाही देतो.यावेळी मा. राजेशजी पांडे (संघटन सरचिटणीस पुणे शहर), मा. दत्ताभाऊ खाडे (सरचिटणीस पुणे शहर), नगरसेविका नीलिमा ताई खाडे, मा. श्रीपादजी ढेकणे, रवींद्र साळेगावकर (अध्यक्ष शिवाजीनगर), प्रतुल जागडे (सरचिटणीस शिवाजीनगर), गणेश बगाडे (सरचिटणीस शिवाजीनगर), आनंद छाजेड (सरचिटणीस शिवाजीनगर) आदि उपस्थित होते.
Add your gallery here