शिवाजीनगर मतदार संघातील पाण्याच्या समस्यांबाबत सविस्तर आढावा बैठक

November 18, 2021

शिवाजीनगर मतदार संघातील पाण्याच्या समस्यांबाबत सविस्तर आढावा बैठक…!मी सुरु केलेल्या आमदार आपल्या दारी या अभियानांतर्गत वस्ती संपर्क अभियान, सोसायटी संपर्क अभियान, सार्वजनिक स्वच्छतागृह पाहणी अभियान या दरम्यान आलेल्या पाण्याच्या तक्रारींवर आज पुणे मनपाचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी श्री. पावसकर साहेब यांच्याबरोबर सविस्तर बैठक घेतली. सदरील तक्रारींचे लवकरात लवकर निवारण करावे अशा सूचना सबंधित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या. यावेळी मा. उपमहापौर सौ. सुनिताताई वाडेकर, मा. दत्ताभाऊ खाडे, नगरसेविका सौ. निलीमाताई खाडे, नगरसेविका सौ. ज्योत्स्नाताई एकबोटे, नगरसेविका सौ. राजश्री ताई काळे, नगरसेवक प्रकाश ढोरे जी, नगरसेवक आदित्य माळवे जी, मा. रवींद्र साळेगावकर, मा. प्रतुल जागडे, मा. आनंद छाजेड, मा. मधुकर मुसळे, मा. ओंकार केदारी तसेच पुणे मनपाचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Add your gallery here