संघटन गढे चलो… कर्तव्य पथ पर बढे चलो…!गोवा विधानसभेची निवडणूक
January 10, 2022संघटन गढे चलो… कर्तव्य पथ पर बढे चलो…!गोवा विधानसभेची निवडणूक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडणार आहे. आपल्या सर्वांचे नेते व मार्गदर्शक मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर केंद्रीय भाजपा नेतृत्वाने गोवा निवडणुकीची जबाबदारी दिलेली आहे. देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी, मा.श्री. अमितभाई शहा जी, मा.श्री. जे पी नड्डा जी व मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली गोवा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत येईल असा मला विश्वास आहे. गोवा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने माझ्यावर गोवा येथील सेंट आंड्रे विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविली आहे. याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो. पक्षाने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडून त्या विधानसभेमध्ये भाजपाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वांनी संकल्प केला आहे. या संकल्पाची सिद्धी करण्यासाठी जी मेहनत करावी लागेल यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत.तेथील विद्यमान आमदार मा.श्री. फ्रान्सिस को सिल्वोरा यांचेबरोबर त्यांच्या निवास्थानी बैठक घेतली व मतदार संघाचा आढावा घेतला. सेंट आंड्रे विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण २१ हजार मतदार आहेत. यामध्ये ११ हजार पुरुष व १० हजार महिला आहेत. तसेच या मतदारसंघामध्ये कुडका – बांबोलीम, सिरडाओ – पाले, बतीम, गोवा – वेल्हा, सेंट लॉरेन्स, नेउरा, अॅझोसीम – मंडूर अशा ७ पंचायत आहेत. तसेच दुसरी बैठक सेंट आंड्रे विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे पदाधिकारी यांचेबरोबर घेऊन बूथ रचना, बूथ बैठकी, कार्यकर्ता भेटीगाठी, घरोघरी संपर्क, सभा अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करून कामास प्रारंभ केला. तेथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामधील उत्साह पाहून आनंद वाटला व याच उत्साहामुळे येणाऱ्या निवडनुकीमध्ये आम्हाला काम करण्यास उर्जा मिळणार आहे. भारतीय जनता पार्टी ने या अगोदर सुद्धा मला बंगाल निवडणुकीमध्ये बोलपूर विधानसभेची जबाबदारी दिलेली होती. व आता गोवा निवडणुकीमध्ये सुद्धा सेंट आंड्रे मतदार संघाची जबाबदारी दिलेली आहे. पक्षाने वेळोवेळी दाखविलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी नेहमीच प्रामाणिकपणे, मेहनतीने, चिकाटीने पार पाडत आहे. आमच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची कष्ट करण्याची नेहमीच तयारी असते म्हणूनच आम्ही जगातील एक नंबरची मोठी पार्टी आहे व देशातील विविध राज्यांमध्ये आमची सत्ता आहे. म्हणूनच भाजपाला “पार्टी विथ डिफरन्स” असे म्हटले जाते.पुण्यासह महाराष्ट्रात व संपूर्ण देशामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. आपण सर्वांनी कोरोना नियमावलीचे पालन करून सुरक्षित राहूया. मी जरी पुण्यामध्ये नसलो तरी माझे संपूर्ण लक्ष आपल्या शिवाजीनगर मतदार संघावर आहेच. तुम्ही मला कॉल, मेसेज करून आपल्या समस्या सांगू शकता. तसेच माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये माझी टीम सदैव आपल्या सेवेमध्ये आहेच.धन्यवाद !
Add your gallery here