
संस्कृती पुरस्कार सोहळा…!
June 2, 2022संस्कृती पुरस्कार सोहळा…!संस्कृती शिक्षण समूह संस्थेतर्फे भुकूम पुणे येथील संस्थेच्या शैक्षणिक परिसरात आयोजित केलेल्या विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल ८ व्यक्तींना संस्कृती पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये मला प्रशासनाच्या क्षेत्रातील विशिष्ट सेवा याबद्दल महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी जी यांच्या शुभहस्ते संस्कृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मी भाजपाचे नेतृत्व कार्यकर्ते, माझी टीम आणि #पुणेच्या सेवेत अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांना समर्पित करतो.तसेच यावेळी जहांगीर हॉस्पिटलचे मुख्याधिकारी जहांगीर एच सी जहांगीर, लेखिका नमिता गोखले, जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले, शिक्षण तज्ज्ञ कमला इडगुंजी, मिरर नाऊचे सहयोगी संपादक मंदार फणसे, सकाळ माध्यमचे संपादक सम्राट फडणीस, दिव्यांग ऑलिम्पिकपटू प्रियेशा देशमुख यांना सुद्धा संस्कृती पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी एनडीएचे कमांडंट व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, संस्कृती समूहाच्या संस्थापिका देवयानी मुंगली व सहसंस्थापक कर्नल (नि.) गिरीजा शंकर मुंगली, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते.
Add your gallery here