सांसद आदर्श ग्राम योजना
June 28, 2016सांसद आदर्श ग्राम योजना ह्या केंद्रीय सरकारच्या योजनेअतंर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी वडगाव शिंदे नंतर शिरूर तालुक्यातील कासारी ह्या गावाची निवड केली आहे. या निमित्ताने कासारी गावात नागरिकांच्या भेटीगाठीसाठी जाण्याचा योग आला. यावेळी गावाचा व्हिलेज डेव्हलपमेंट प्लान कसा असावा याबाबत सर्व नागरिकांशी चर्चा व विनयविमश करण्यात आले. तसेच वृक्षरोपणाचे कार्यक्रम व जलसंधारण प्रोजेक्ट चे उद्घाटन व गावातील शाळेतील कार्यक्रमांना जाण्याचा योग आला. गेल्या दोन वर्षांमध्ये वडगाव शिंदे मध्ये सरकारच्या माध्यमातून तब्बल अडीच कोटींची विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत.व येत्या काळामध्ये राहिलेली सर्व विकास कामे ही पूर्ण करण्यात येतील. आणि वडगाव शिंदे हे एक मॉडेल व्हिलेज म्हणून सांसद आदर्श ग्राम योजनेच्या मार्फत प्रस्थापित होईल. ह्याच धरतीवर कासारी गावाचा विकास समस्त गावकऱ्यांना बरोबर घेऊन येत्या दोन वर्षांत नक्कीच होईल असा मला विश्वास आहे.