
हिंद शक्ती सोशल फाउंडेशन
July 23, 2016हिंद शक्ती सोशल फाउंडेशन द्वारा आयोजित पोस्टमन बंधूना रेनसुट वाटप अशा समाजउपयुक्त कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा योग आला.
समाजाची खरी गरज ओळखून ती सोडवण्याचा प्रयत्न करणे हेच खऱ्या अर्थाने समाजकारण आहे.
पोस्टमन बंधू हे पोस्ट ऑफिस च्या माध्यमातुन अनेक वर्षे देशाची सेवा करत आले आहेत. अशा या पोस्टमन बंधूना
पावसाळ्यात आरोग्यदायी राहावे या हेतूने रेनसुट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला गेला.
हिंद शक्ती सोशल फाउंडेशन व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. व
त्यांच्या माध्यमातुन समाजाची अशीच सेवा व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.