१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ…!
January 3, 2022१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ…!आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुला – मुलींचे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. आज पुणे मनपाचे दळवी हॉस्पिटल येथील लसीकरण मोहिमेस भेट दिली व लस घेणाऱ्या उपस्थित मुला – मुलींचे स्वागत केले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक आदित्य माळवे, नगरसेविका सोनालीताई लांडगे, पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, डॉ. मृणाली कोलते, डॉ. घारे उपस्थित होते. दोन वर्षांपासून जगभरात कोरोना व्हायरसचे संकट आहे आणि या संकटाला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण धैर्याने सामोरे गेलो. जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.कोरोनाला हरवायचं असेल तर लसीकरण हे कोरोना लढाईतलं मोठं अस्त्र आहे. म्हणूनच नव्या वर्षात आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्याचा मोठा निर्णय मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला व त्याची प्रत्यक्ष सुरुवात देखील झाली. शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुला – मुलींची, पालकांची चिंता कमी होण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचलले आहे. यामुळे मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. मी सर्व पालकांना आणि त्यांच्या पाल्यांना नम्र विनंती करतो की या लसीकरण मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. लसवंत होऊन कोरोना संकटाला हरवूया.
Add your gallery here