1000 स्कूल बस चालकांना प्रत्येकी 1000 रुपयांचे चेक आज सुपूर्त करण्यात आले.

August 10, 2021

सब समाज को लिये साथ में, आगे है बढते जाना…!कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यभर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे सर्व स्कूल बंद आहेत. यामुळे स्कूल बस चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांच्यापुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे. यासाठी त्यांना हातभार लावावा या प्रामाणिक हेतुने पुणे शहर भाजपा च्या वतीने 1000 स्कूल बस चालकांना प्रत्येकी 1000 रुपयांचे चेक आज सुपूर्त करण्यात आले. मला अभिमान आहे की भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या संकट काळामध्ये रस्त्यावर उतरून समाजातील प्रत्येक गरजू कुटुंबातील घटकांना मदत केली आहे. यापुढेही भाजपा सदैव आपल्या बरोबर होती, आहे, आणि यापुढेही राहील अशी ग्वाही देतो.यावेळी महापौर मा. मुरलीधर मोहोळ, मा.डॉ. दवडगावकर, मा. दीपक नागपुरे, मा. श्रीपाद ढेकणे सर, मा. दीपक पोटे, मा. राघवेंद्र मानकर, मा. पुनीत जोशी, मा. योगेश बोराडे, मा. वाघे साहेब, मा. राजेंद्रसिंगजी , मा. जोरडे साहेब, आदि मान्यवर उपस्थित होते

Add your gallery here