आज खडकी येथील भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खडकी छावणी परिषद हॉस्पिटला भेट दिली आणि रूग्णालयाच्या प्रभारी डॉ. भोसले जी आणि वैद्यकीय कर्मचार्यांशी विस्तृत चर्चा केली, रूग्णांशी संवाद साधला आणि सुविधांचा आढावा घेतला.
September 16, 2020आज खडकी येथील भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खडकी छावणी परिषद हॉस्पिटला भेट दिली आणि रूग्णालयाच्या प्रभारी डॉ. भोसले जी आणि वैद्यकीय कर्मचार्यांशी विस्तृत चर्चा केली, रूग्णांशी संवाद साधला आणि सुविधांचा आढावा घेतला.
हॉस्पिटल मध्ये सध्या कोरोना रुग्णांवरती उपचार केला जातो. हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन बेड, ई. प्रकारच्या सुविधा आहेत. परंतु याठिकाणी येणाऱ्या क्रिटीकल रुग्णांसाठी आय.सी.यु व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था नसल्याने त्यांना दुसरीकडे पाठवावे लागत आहे. म्हणून हॉस्पिटल साठी पुणे शहरातील कोणत्याही DCH हॉस्पिटल मध्ये कोरोना बाधित रुग्णांसाठी १० आय.सी.यु व्हेंटीलेटर बेड राखीव ठेवावेत, असे निवेदन मी मा. विभागीय आयुक्त, श्री.सौरभ राव यांच्या कडे केले आहे.
यावेळी खडकी छावणी परिषद उपाध्यक्ष दुर्योधन भापकर जी, आरोग्य आणि रुग्णालय आणि महिला व बालकल्याण अध्यक्ष कार्तिकी हिवरकर जी, नागरी क्षेत्र समिती अध्यक्ष कमलेशचास्कर जी, छावणी परिषद सदस्य अभय सावंत जी,
खडकी कॅन्टोन्मेंट भा.ज.पा अध्यक्ष धर्मेश शाह जी, मुकेश गवळी जी, चिंतन शाह जी, अजित पावर जी, बंडू कदम जी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.