अंकुर विद्यालयाला ‘टॅब’चे वितरण.
September 21, 2020अंकुर विद्यालयाला ‘टॅब’चे वितरण.
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, हिंदूगर्जना प्रतिष्ठान आणि साने गुरुजी मंडळाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारातील अंकुर विद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘टॅब’चे वितरण करण्यात आले. अंकुर विद्यालय ही संस्था गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत असून, आज त्या ठिकाणी दीडशे सव्यंग आणि अव्यंग विद्यार्थी शिकत आहेत.
सभागृह नेते श्री.धीरज घाटे यांनी आयोजित या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेश कार्यकरिणी सदस्य आणि पुणे शहर प्रभारी गणेश बिडकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, अंकुर विद्यालयाच्या संस्थापिका आणि प्रमुख मा. माधुरीताई देशपांडे, भाजपाचे शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष रवींद्र साळेगांवकर आदी या वेळी उपस्थित होतै.
Add your gallery here