खडकी छावणी परिषद ह्द्देतील बाजारपेठा
June 8, 2021गेल्या दोन महिन्यांपासून खडकी छावणी परिषद ह्द्देतील बाजारपेठा लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बंद होत्या. सध्या कोरोना च्या केसेस मध्ये घट आल्याने पुन्हा बाजारपेठा चालू कराव्यात अशी मागणी माझ्याकडे खडकीतील व्यापारी बांधवांनी केलेली होती. या मागणी नुसार मी पुण्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार तसेच पुण्याचे लोकप्रिय खासदार मा. गिरीषभाऊ बापट यांच्याकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून खडकी छावणी परिषद ह्द्देतील बाजारपेठा चालू करण्यास परवानगी दिली आहे. मी दोघांचे मनापासून आभार मानतो. आज या बाजारपेठांमध्ये जाऊन भेट दिली व विविध विषयांवर व्यापारी बांधवांशी चर्चा केली. यावेळी खडकी भाजपाचे अध्यक्ष धर्मेशजी शहा, मा. नगरसेविका कार्तिकीजी हिवरकर, मा. नगरसेवक दुर्योधनजी भापकर, मुकेशराव गवळी, अमरजी देशपांडे, नेहाजी गोरे, चिंतन शहा, अजित पवार, नितीन शिंदे, धीरज गुप्ता, विकी अगरवाल, सुनील अगरवाल, हरीश दुदानी, जयेश दुदानी, अमित दुदानी, श्याम अगरवाल, शंकर तेजवानी, नरसिंग तेजवानी, प्रकाश लालचंदानी, राजेश अगरवाल, गोपाल बुरेवार, सतीश जावरानी, सुरजभान अगरवाल, शांतीलाल क्षत्रिय आदि उपस्थित होते.
Add your gallery here