“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे”

June 6, 2021

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” हा संत तुकाराम महाराजांचा अभंग, प्रत्येकाला वृक्ष संपदेचे, वनसंपदेचे महत्त्व पटवून देतो. तसेच हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांनी ”गड तेथे आमराई, गाव तेथे वनराई” हा नारा आपल्या आज्ञापत्रातून देऊन त्या काळी जंगल संपत्तीचे महत्त्व पटवून दिले. यावरून त्यांचा पर्यावरणविषयीचा उदात्त हेतू स्पष्टपणे दिसून येतो. दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.वृक्ष, झाडे आपणास ऑक्सिजन देतात, ऑक्सीजन ज्याच्याशिवाय आपण काही मिनिटांपेक्षा जास्त जगू शकत नाही. या कोरोना महामारीच्या काळामध्ये ऑक्सिजनचे महत्व आपण सर्वांनी बघितले आहे. परंतु यामधून आपण काहीतरी शिकले पाहिजे म्हणूनच समाजातील प्रत्येक घटकाने वनक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी केवळ वृक्षांची लागवड करून उपयोग नसून, लावलेली झाडे जगविली पाहिजेत. याकरिता सामाजिक संस्था लोकसहभागाच्या माध्यमातून स्थानिक परिस्थितीनुरूप वृक्ष लागवड व संगोपन ही चळवळ उभारायला हवी. आपल्या देशाला वैविध्यपूर्ण जैवविविधता लाभली आहे. पृथ्वीचे आरोग्य राखणे म्हणजे आपले आरोग्य राखण्यासारखेच आहे. पृथ्वीचे आरोग्य राखण्यामध्ये वने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. वनांमुळे पक्षी, पशू, प्राण्यांना अधिवास लाभतो. जमिनीची धूप रोखली जाते. जमिनीत पाणी मुरते व पूर-दुष्काळ यांसारख्या आपत्ती रोखण्यास मदत होते.ना वल्लींमध्ये जीवन। नाना फळीफुली जीवन। नाना कंदी मुळी जीवन। गुणकारके।। नाना वल्ली नाना पिके। देसोदेसी अनेके। पाहो जाता सारिख्या सारिखे। येकही नाही।। नाना वल्ली बीजांची खाणी। ते हे विशाळ धरणी। अभिनव र्कत्याची करणी। होऊन गेली।। (दासबोध)पृथ्वी ही किती बहुविध रत्नांची खाण आहे, येथील जीवसृष्टी किती वैविध्यपूर्ण आहे, जीवनाचा प्रवाह अविरतपणे वाहता राहतानाच झाडझाडोरा, वृक्षवेली, जीवजंतू यांनी ही पृथ्वी कशी नटून गेली आहे, या वृक्षवल्लींमध्ये किती गुणकारी औषधी आहेत असे विविधांगी वर्णन दासबोधात आढळते. आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. वृक्षारोपण करून आपले कर्तव्य संपत नाही तर लावलेले झाड व्यवस्थितरीत्या वाढणेदेखील महत्त्वाचे आहे. तरच निसर्गाचा समतोल राखला जाईल. वृक्षरोपण करणे हि काळाची गरज आहे, निसर्गाला दुरावून आपण जीवन जगुच शकत नाही. तरी जास्तीत जास्त झाडे लावूया आणि त्यांना जगवूया व पृथ्वीमातेचे संरक्षण करूया !#WorldEnvironmentDay#GenerationRestorationNote : File Photos.3,136People Reached318EngagementsBoost Post

2482481 Comment3 SharesLikeCommentShare

Add your gallery here