पुणे शहराचे मा. खासदार श्री. अनिल शिरोळे साहेबांच्या खासदार निधीतून तीन चाकी व हलक्या वाहनांची योग्यता तपासणी करिता रोलर ब्रेक टेस्टिंग

June 16, 2021

पुणे शहराचे मा. खासदार श्री. अनिल शिरोळे साहेबांच्या खासदार निधीतून तीन चाकी व हलक्या वाहनांची योग्यता तपासणी करिता रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टीमसाठी सन २०१८ साली ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पाची आज प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.या रोलर ब्रेक टेस्टिंग साठी रिक्षा चालक व अन्य वाहनांना दिवे घाटात जावे लागते. सदरील टेस्टिंग प्रकल्प हा पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO येथे होत आहे. या प्रकल्पामुळे छोट्या वाहनधारकांचा वेळ व इंधन ची निश्चितच बचत होणार आहे.यावेळी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, सार्वजिनक बांधकाम विभागाचे श्री. पाटील साहेब, साज टेस्ट प्लांट प्रायव्हेट लि. च्या मा. ऋतुजा जगताप उपस्थित होते.

Add your gallery here