कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज बैठक पार पडली.
June 19, 2021कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी आज खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.1) ज्या परदेशात जाणाऱ्या नागरिकांनी Covaxin घेतले आहे अशा नागरिकांना परदेशात जाता येत नाही कारण WHO ने या लसीला मान्यता दिलेली नाही. तरी याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारशी पत्र व्यवहार करून लवकरात लवकर Covaxin लसीला मंजुरी मिळणेबाबत मागणी करावी.2) मुंबईतील एका सोसायटी मध्ये लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक करून नागरिकांना वेगळ्या प्रकारची लस देण्यात आली असा प्रकार पुण्यामध्ये घडू नये म्हणून शासनाने खबरदारी घ्यावी.3) पुणे शहरातील जंबो कोविड सेन्टर्स चे इन्फ्रास्ट्रक्चर ऑडिट करावे. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची खबरदारी लक्षात घेत जंबो कोविड सेन्टर्स बंद करण्याची घाई करू नये.4) ज्या नागरिकांचे लसीचे दोन्हीही डोस पूर्ण झाले असून देखील त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झालेली आहे व मृत्यू झालेला आहे अशा नागरिकांची यादी काढणे.
Add your gallery here