आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून देण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिना निमित्त
July 1, 2021भारतीय जनसंघाचे संथापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिना निमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत शिवाजीनगर मतदार संघाचे युवा मोर्चा चिटणीस श्री. प्रशांत लाटे व भाजपा महिला आघाडी सोशल मिडिया सदस्य सौ.खुशीताई लाटे यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून देण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आला.भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी ह्यांनी 2018 रोजी या योजनेचा शुभारंभ केला. ‘सर्वांसाठी आरोग्य’ ह्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्यमान भारत’ योजना महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बीपीएल कुटुंबाला केंद्र शासनाकडून 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येतो. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना शासनाने निवडलेल्या शासकीय व खासगी रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांना (बीपीएल धारकांना) आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे (सरचिटणीस पुणे शहर), मा. रवींद्र साळेगावकर (अध्यक्ष शिवाजीनगर), सुधीरजी अल्हाट, प्रतुलजी जागडे, अपर्णाताई कुऱ्हाडे, ओमकारजी केदारी, अपूर्वजी खाडे, रोहितजी लिंबोळे, प्रभाग क्र १४ मधील नागरिक, भाजपा चे कार्यकर्ते, पदाधिकारी
Add your gallery here