ससून रुग्णालयास भेट..

August 18, 2021

ससून रुग्णालयास भेट…!पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरिबांचा आधार वाटणारे रुग्णालय म्हणजेच ससून रुग्णालय. गेल्या १५० वर्षांपासून समाजातील सर्व घटकातील गोरगरीब रुग्णांना अविरत सेवा देणारे हे रुग्णालय अजून चांगल्याप्रकारे सशक्तीकरण करणे हा माझा संकल्प आहे. पालकमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्याबरोबर जून मध्ये झालेल्या बैठकीमध्ये मी ससून रुग्णालय सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीने हॉस्पिटलमध्ये कायम स्वरूपाची आरोग्य व्यवस्था उभी करावी. त्या ठिकाणी बेड्स ची व्यवस्था वाढविणे तसेच तेथील जागेचा वापर कायमस्वरूपी आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी करावा. जेणेकरून कोरोना व अन्य रोगांवर त्याठिकाणी अजून चांगले उपचार होतील. अशा मागण्या केल्या होत्या त्या अनुषंगाने आज ससून रुग्णालय व बी.जे.मेडिकल कॉलेज येथे भेट देऊन पाहणी केली.ससून रुग्णालय व मेडिकल कॉलेज हे तब्बल ४३ एकर मध्ये असून आज या रुग्णालयाचा विकास आराखडा समजून घेतला. यानुसार सध्या ससून रुग्णालयाच्या दोन इमारती दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर झालेला असून लवकरच त्याचे काम सुरु होईल असे सांगण्यात आले. ससून रुग्णालयास सध्या हॉस्टेल व नर्सिंग हॉस्टेल ची जास्त आवश्यकता असून राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होण्यासाठी रुग्णालयाने प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविलेला आहे. तसेच औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या जागेत ससून मार्फत फ़िजिओथेरेपी हॉस्पिटल व डेंटल हॉस्पिटल व्हावे यासाठी परवानगीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला असून या दोन्ही प्रस्तावास लवकर मान्यता मिळवून देण्याबाबत मी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.बैठकीला ससून रुग्णालय चे डीन (प्रशासन) डॉ मुरलीधर तांबे जी , प्रशासकीय अधिकारी एस चोकलिंगम जी, वरिष्ठ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

Add your gallery here