मैं “किसी से” बेहतर करुं क्या फर्क पड़ता है..! मै “किसी का” बेहतर करूं बहुत फर्क पड़ता है..!!
July 31, 2021कु. श्रावणी वाळूंज, वय वर्षे १४ हिने काही महिन्यांपूर्वी आपला डावा हात अपघातात गमावला. खेळण्या – बागडण्याच्या वयात हात गमावण्याचे दुखः काय असते हे आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही. आज फिटवेल गॅसकेट को प्रायव्हेट लि. या कंपनीच्या माध्यमातून तिला ‘रोबोटिक हात बसविण्यात आला. आज तिच्या त्या हातामध्ये संवेदना निर्माण झाल्या आहेत, ही गोष्ट तिच्यासाठी आणि सर्वांसाठीच खूप आनंदाची आहे. ती स्वतः लिहू लागली आहे, भाजी चिरू लागली आहे, शूज च्या लेस बांधू लागली आहे, हे सर्व करताना तिला खूप आनंद होत आहे असे तिने आम्हास आवर्जून सांगितले. हात हे आपले सर्वस्व असतात, तेच गमावल्यानंतर काय अवस्था होत असेल हे श्रावणी ने स्वतः अनुभवलं आहे. श्रावणी च्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. परंतु उपचाराचा खर्च तिच्या कुटुंबियांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांना मदतीची गरज पडली. वाळूंज कुटुंबीयांवर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी माझ्या प्रयत्नातून फिटवेल गॅसकेट को प्रायव्हेट लि. चे श्री. चैतन्यजी शिरोळे यांनी पुढाकार घेवून श्रावणीला ‘रोबोटिक हात’ मिळवून देण्यासाठी मदत केली, त्याबद्दल मी श्री. चैतन्यजी शिरोळे यांचे मनापासून आभार मानतो.आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो. ज्यांना गरज असते त्यांना योग्य वेळी मदत करणे हीच खरी माणुसकी. ज्यांना आपण प्रामाणिकपणे मदत करतो त्यावेळी त्यांनी दिलेले आशीर्वाद मला माझ्या पुढील कार्यासाठी नेहमीच प्रेरणा देतात.
Add your gallery here