आत्मनिर्भर भारत मोहिम
October 15, 2021आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत भारताला स्वतःच्या बळावर जगातील सर्वात मोठी लष्करी शक्ती बनवणे, भारतातील आधुनिक लष्करी उद्योगाचा विकास हे देशाचे ध्येय आहे. याचाच एक भाग म्हणजे देशातील ४१ ऑर्डिनन्स फॅक्टरीजचे रूपांतर केंद्र सरकारने ७ नव्या कंपन्यांमध्ये करून आज नवे पाऊल टाकले आहे. या कंपन्यांची स्थापना आणि लोकार्पण आपले लोकप्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी व संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंह जी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या ७ नव्या कंपन्या देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनाची मोठी गरज भागविणार आहेत. नवे संशोधन आणि नवे उत्पादन यावर या कंपन्यांचा भर असणार आहे.दुसऱ्या महायुध्दाच्या काळात ब्रिटिशांनी भारतीय इंजिनिअर्स आणि कामगारांचा आणि भारतीय रिसोर्सेचा आपल्या सैन्यासाठी उपयोग करण्यासाठी ऑर्डिनान्स फॅक्टरीज अर्थात दारूगोळा कारखाने उघडले होते. सध्या यांची संख्या ४१ आहे. मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या फॅक्टरींमध्ये नवे तंत्रज्ञान आणले गेले नाही. त्यांची क्षमता वापरली गेली नाही. त्यातून देशाच्या सैन्य़शक्तीची शस्त्रांची आणि उपकरणांची गरज पुरेशी भागविली गेली नाही.मात्र, मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतून य़ा ऑर्डिनान्स फॅक्टरीजचे रूपांतर ७ कंपन्यांमध्ये करून त्याची मालकी आणि भांडवल १०० टक्के सरकारी ठेवले आहे. यामध्ये प्रोफेशनल मनुष्यबळ, नवे तंत्रज्ञान या आधारे उत्पादन करण्यात येईल. ही उत्पादने भारतीय सैन्य दलांना उपलब्ध करून देण्याबरोबरच शस्त्रास्त्रे – सामग्री आणि उपकरणांची निर्यात देखील करण्यात येणार आहे.या सात संरक्षण कंपन्यांमध्ये मुनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL), आर्मर्ड व्हेईकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (अवनी); एडवांस्ड वेपन्स एंड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड (एडब्ल्यूई इंडिया); ट्रूप कम्फर्ट्स लिमिटेड (टीसीएल); यंत्र इंडिया लिमिटेड (YIL), इंडिया ऑप्टेल लिमिटेड (आईओएल) आणि ग्लाइडर्स इंडिया लिमिटेडचा (जीआईएल) समावेश आहे.यातील मुनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) ही कंपनी पुण्यातील असून या कंपनीचा लोगो चे अनावरण माझ्या हस्ते करण्यात आले.
Add your gallery here