मा. अपर्णाताई कुऱ्हाडे यांनी सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

October 19, 2021

आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे त्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे, अशी अनेक जनसेवेची कामे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून होत असतात. नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी एक हक्कच असं ठिकाण म्हणजे जनसंपर्क कार्यालय होय. भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस मा. अपर्णाताई कुऱ्हाडे यांनी सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या भागातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय काम करेल असा मला विश्वास आहे. यावेळी पुणे शहराचे खासदार मा.श्री. गिरीश भाऊ बापट, महापौर मा. मुरलीधर आण्णा मोहोळ, मा. राजेशजी पांडे, मा. दत्ताभाऊ खाडे, नगरसेविका निलीमाताई खाडे, नगरसेविका राजश्री काळे, नगरसेवक आदित्य माळवे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. गणेशजी बगाडे, मा. आनंदजी छाजेड, मा. अपूर्व खाडे तसेच स्थानिक नागरिक, भाजपाचे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Add your gallery here