औंध-सांगवी येथे नव्याने होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी व आढावा

October 21, 2021

औंध-सांगवी येथे नव्याने होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी व आढावा…!औंध–सांगवी रस्त्यावरील जुन्या पुलाजवळ नव्याने पूल उभारण्याचे काम सुरू आहे. आज त्याची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. औंधमधील डिमार्टजवळ नदीवर असलेला जुना पूल काही वर्षांपासून खराब अवस्थेत होता. त्यामुळे औंध, वाकड व सांगवीला जोडणाऱ्या या पुलाजवळ नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. सदरील पूल १०० मीटर लांबीचा असून या पुलाचे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होईल व एप्रिल २०२२ पासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या पुलाचा पुणे व पिंपरी चिंचवड भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी फायदा होणार आहे. यावेळी पुणे मनपाचे प्रकल्प अधिकारी मा. श्रीनिवास बोनाला व त्यांची टीम उपस्थित होती.

Add your gallery here