पुणे विद्यापीठ ते ई स्क्वेअर दरम्यानच्या नियोजित मेट्रो / उड्डाण पुलाच्या कामा मुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याचा दृष्टीने उपाययोजना प्रशासनाला सुचविल्या.
November 8, 2021पुणे विद्यापीठ ते ई स्क्वेअर दरम्यानच्या नियोजित मेट्रो / उड्डाण पुलाच्या कामा मुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याचा दृष्टीने उपाययोजना प्रशासनाला सुचविल्या.नियोजित उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता मी पुणे महापालिका, पीएमआरडीए यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. दिवाळीनिमित्त शासकीय कार्यालयांना सुट्या होत्या. त्या आटोपताच आज अधिकाऱ्यांना बोलावून उड्डाणपुलाच्या कामाची संपूर्ण पाहाणी केली. विद्यापीठ चौकातून औंध, बाणेर तसेच सेनापती बापट मार्ग याकडे जाणाऱ्या वाहनचालकांची कोंडीमुळे होणारी गैरसोय टाळावी याकरीता बारीकसारीक सूचना केल्या. विद्यापीठाकडून शिवाजीनगर कडे येताना जो सायकल ट्रॅक आहे त्याचा वापर मेट्रो चे काम चालू झाल्यावर करता येईल, त्या मुळे रस्त्या ची रुंदी वाहतुकीला जास्त मिळेल आणि कोंडी कमी होईल.तसेच जेंव्हा खरी गरज आहे तेंव्हाच बॅरिकेड्स लावण्यात यावे. वेमनिकोंम येथील रस्ता उघडणे, तसेच काही बस थांबे यांची जागा बदलने आणि मुळात इतर ठिकाणी डायवर्जन करून विद्यापीठ रस्ता कमीत कमी कसा वापरता येईल याचा विचार करण्यात यावा अशी या बैठकीत चर्चा झाली. तसेच बाणेर पासून सेनापती बापट रस्त्याला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे काम पाहिले सुरू केले पाहिजे जेणेकरून विधी महाविद्यालय कडे जाणारे वाहतूक सुरळीत निघून जाईल आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी तात्पुरता उड्डाणपूल या भागात करण्यात यावा, असे पण अधिकाऱ्यांना सुचविले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पादचाऱ्यांचीही सोय करण्यासाठी ज्या सूचना केल्या, त्यांचा दैनंदिन पाठपुरावा करणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.
Add your gallery here