पुणे जिल्ह्याची खरीप हंगाम सन 2022 – 23 आढावा बैठक
May 6, 2022पुणे जिल्ह्याची खरीप हंगाम सन 2022 – 23 आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालय येथे पार पडली. या बैठकीत मी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले…1) दरवर्षी बियाण्यांच्या बाबत शेतकरी तक्रार करत असतात खराब बियाणांमुळे दुबार पेरणी ची वेळ येते त्यामुळे चांगले प्रतीचे बियाणे मिळावे बऱ्याच जिल्ह्यात बियाण्यांची कमतरता जाणवत असते ती कमतरता होऊ नये याकरिता काय उपाययोजना करता येतील त्या कराव्यात.2) शेतकरी बांधवांची दरवर्षी खता बाबत ही तक्रार असते त्यांना चांगल्या प्रतीचे खत मिळावे व खत वेळेत मिळावे जेणेकरून त्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही.3) ग्रामपंचायत व तालुका पातळीवर पेरणी कधी करावी, याबाबत शेतकऱ्यांचे अधिक प्रबोधन करावे.4) भुईमुगाचे पिक कमी होण्यामागे सर्वात मोठे कारण काय आहे ?तर काही भागांत रानडुक्कर खुप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत ते भुईमुग पुर्ण खाऊन टाकतात .त्यामुळे आता हे पिक लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे .यावर काय उपाययोजना करता येईल ? ते पाहणे गरजेचे आहे.5) ऊसाबाबत या वर्षी खुप मोठ्या प्रमाणात उस लागवड झाली. पंरतु या हंगामात बऱ्याच कारखान्यानी ऊस घेणे बंद केले आहे.ऊस तोडणारे ठेकेदार ऊसतोडणी करण्यासाठी १५,०००/- रुपये एकरी मागत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे होत आहे.6) रब्बी हंगामासाठी जे सोयाबीन चे बियाणे recommend केलं होतं ते अतिशय खराब quality चे होतं. उत्पन्न (yield) कमी आलंय आणि पिकावर रोगराई पसरली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.खरीप हंगामासाठी शासनाने योग्य अभ्यास करून शेतकऱ्यांना चांगल्या दर्ज्याचे बियाणे पुरस्कृत (recommend) करावे.