शिवाजीनगर येथील रहिवाशांना रेल्वे विभागाकडून घरे खाली करण्याच्या नोटिसा
April 2, 2022आपल्या शिवाजीनगर मतदारांघातील विष्णू कृपा नगर व प्लॉट नं. 11 शिवाजीनगर येथील रहिवाशांना रेल्वे विभागाकडून घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. रेल्वे विभागाच्या म्हणण्याप्रमाणे सदरील वसाहती मधील रहिवाशी राहत असलेली जागा ही रेल्वे विभागाची आहे व तेथील नागरिकांनी यावर अतिक्रमण केलेले आहे. परंतु सदरील वसाहती मधील नागरिक हे वर्षानुवर्षे त्याच जागेत राहत आहेत. सध्याच्या कोरोना साथीच्या परिस्थितीमुळे नागरिकांना प्रत्येक आघाडीवर अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि अशा नोटिसींमुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडेल. त्यांच्या अडचणी वाढू नयेत व त्यांना बेघर होऊ न देण्यासाठी या विषयासंदर्भात मी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे साहेबांशी संपर्क साधला असून सदरील प्रकार त्यांना सांगितलेला आहे. लवकर त्यांची भेट घेऊन या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढणार आहे.यावेळी मा. सुधीरभाऊ आल्हाट, मा. गणेश बगाडे, मा. सायलू चलवादी, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add your gallery here