फर्ग्युसन कॉलेज रोडची पाहणी…
March 30, 2022फर्ग्युसन कॉलेज रोडची पाहणी…!फर्ग्युसन कॉलेज रोडवर काही ठिकाणी फुटपाथवर वारंवार कचरा पडत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आज फर्ग्युसन कॉलेज रोडची पाहणी केली. या पाहणी दरम्यान असे निदर्शनास आले की ठिकठिकाणी कचरा पेठ्या असून सुद्धा नागरिक, स्थानिक छोटे व्यावसायिक, कचरा हा कचरापेठीत न टाकता तो फुटपाथवर टाकला जातो. यासाठी तेथील स्थानिक व्यावसायिक व नागरिक यांना भेटून आपला कचरा हा कचरा पेठीतच टाकावा यासाठी प्रबोधन केले. तसेच ज्याठिकाणी कचरा फुटपाथवर टाकला जातो अशा ठिकाणी प्रबोधनपर बोर्ड्स लावले जातील व कचरा पेठ्या सुद्धा वाढविण्यात येतील. यासबंधी स्थानिक व्यवसायिक यांचेबरोबर एक बैठक सुद्धा घेण्याचे ठरविले आहे. पुणे मनपाचे आरोग्य विभागातील कर्मचारी त्यांचे काम करीतच असतात. परंतु जागरूक नागरिक म्हणून आपलीसुद्धा जबाबदारी आहे कि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवायचा. तरच आपले शहर स्वच्छ व सुंदर बनेल. यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, नगरसेविका मा. स्वातीताई लोखंडे, मा. सुनील पांडे, मा. अशोक लोखंडे, तसेच पुणे मनपा चे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Add your gallery here