मुळा रोड येथील वाहतुकीची पाहणी…

March 29, 2022

मुळा रोड येथील वाहतुकीची पाहणी…!काल रात्री मुळा रोड येथील वाहतुकीची समस्या जाणुन घेण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांसोबत मुळा रोड येथील अरगडे कॉर्नर येथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन वाहतुकीची पाहणी केली. सदर ठिकाणी बरीच वाहतूक कोंडी होत आहे असे निदर्शनास आले. सदरील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून मुळा रोड सर्कल वरून जुना मुंबई – पुणे रोडकडे वाहतूक वळवावी म्हणजे बरीच वाहतूक कोंडी सुटेल असे तेथील स्थानिकांची व ट्राफिक पोलिसांचे म्हणणे आहे. मुळा रोड येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पोलीस उप आयुक्त वाहतूक श्री. राहुल श्रीरामे यांच्याशी फोनवरून संवाद साधून सर्व परीस्थिती त्यांना सांगितली. यावर श्री. राहुल श्रीरामे यांनी यावर एक बैठक घेऊन सदरील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी उपस्थीत मा. प्रदिप मोरे, मा. बिरु खोमने, मा. राहुलजी भोर, मा. रवींद्र जेऊर, मा. जय जोशी, मा. गोविंद भोगी, मा. आकाश भिंगारे, मा. नरेंद्र गायकवाड, मा. परंजय स्वामी, मा. सतीश ढोरे, मा. दिपक जाधव, मा. किरण पुंडे, मा. सनी पोनरंगम, मा. रोशन दळवी, मा. शेखर स्वामी, मा. अजिंक्य पाटोळे, मा. अमित यादव, मा. रुपेश आदमाने आदि उपस्थित होते.

Add your gallery here