खडकी बोपोडी भागात एक अत्याधुनिक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदान तयार करावे

March 23, 2022

खडकी बोपोडी भागात एक अत्याधुनिक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदान तयार करावे !आज उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, क्रीडा मंत्री सुनील केदारजी, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकर जी यांची भेट घेऊन राज्य सरकारने खडकी बोपोडी भागात एक अत्याधुनिक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदान तयार करावे असे निवेदन दिले. शिवाजीनगर मतदार संघामध्ये हॉकीपटू श्री. धनराज पिल्लेंसारखे नामवंत खेळाडू तयार झाले. त्यांनी भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले असून भारताचे नाव हॉकी क्षेत्रात उज्वल केले आहे. ते ज्या मैदानावर हॉकी शिकले, खेळले ते आपल्या खडकी भागामध्ये येते. बोपोडी येथे अनेक हॉकी खेळणारे खेळाडू आहेत. परंतु त्या ठिकाणी अत्याधुनिक खेळाचे मैदान नसल्यामुळे त्यांना १५ ते २० किलोमीटर लांब बालेवाडी किंवा पिंपरी येथे खेळण्यास जावे लागते. तरी खडकी बोपोडी भागात एक अत्याधुनिक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदान सरकारने तयार करावे अशी मागणी केली.

Add your gallery here