उपकर ०.२ टक्के करावा…!
March 22, 2022उपकर ०.२ टक्के करावा…!नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पात १ एप्रिल पासून मुद्रांक शुल्कात १ टक्का मेट्रो साठी उपकर (cess) आकारण्याचा निर्णय सरकार ने घेतला आहे. हा कर जोडल्या मूळे याचा परिणाम अंतिम ग्राहकांवर म्हणजे थेट घर घेणाऱ्या नागरिकांवर पडेल. हा उपकर आपण कमी करून साधारण ०.२ टक्के करावा आणि इतर व्यवसायांवर उरलेला उपकर टाकावा किंवा हा उपकर सध्याची कोरोना नंतर ची आर्थिक परिस्थिती पाहता २ वर्ष पुढे ढकलावे ही माझी आपणास विनंती आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि बांधकाम क्षेत्रात वास्तविक सकारात्मक परिस्तिथी चालू ठेवण्याकरिता मदत होईल. असे पत्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार यांना प्रत्यक्ष भेटून दिले.