स्वातंत्र्यवीर सावरकर सिटी लायब्ररी प्रकल्पाचा “भूमिपूजन सोहळा”..
March 5, 2022स्वातंत्र्यवीर सावरकर सिटी लायब्ररी प्रकल्पाचा “भूमिपूजन सोहळा”…!शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या घोले रस्त्यावर पुणे महापालिकेमार्फत राज्यातील पहिली सर्वात मोठी ‘सिटी लायब्ररी’ होणार आहे. आज या प्रकल्पाचा “भूमिपूजन सोहळा” पार पडला. स्वातंत्र्योत्तर काळात स्थापन झालेल्या तत्कालीन पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयानंतर पुण्याची ग्रंथालय परंपरा पुढे नेण्याचे काम करणारी राज्यातील पहिली ‘सिटी लायब्ररी’ घोले रस्त्यावर साकारत आहे. ५० हजारांहून अधिक ग्रंथसंपदा असणारे हे ग्रंथालय शहरातील मोठ्या सार्वजनिक ग्रंथालयांपैकी एक असेल. स्थानिक नागरिक, अभ्यासक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आदींसाठी महापालिकेचे हे सुसज्ज ग्रंथालय उपयुक्त ठरणार आहे.यावेळी मा. केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार मा.श्री. प्रकाशजी जावडेकर, उपमहापौर मा. सुनिताताई वाडेकर, नगरसेविका मा. ज्योत्स्नाताई एकबोटे, मा. दत्ताभाऊ खाडे, नगरसेविका मा. मंजुश्रीताई खर्डेकर, नगरसेवक मा. सुशील मेंगडे, मा.डॉ. गजानन एकबोटे, मा.डॉ. संदीप बुटाला, मा. रविंद्र साळेगावकर, आदि उपस्थित होते.
Add your gallery here