रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टीम चे उद्घाटन…!
June 1, 2022रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टीम चे उद्घाटन…!पुणे शहराचे मा. खासदार मा.श्री. अनिल शिरोळे साहेबांच्या खासदार निधीतून तीन चाकी व हलक्या वाहनांची योग्यता तपासणी करिता रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टीमसाठी सन २०१८ साली ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाचे आज उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.माल व प्रवासी वाहनांना योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी आळंदी रस्त्यावरील परिवहन कार्यालयाच्या आवारात रोलर ब्रेक टेस्टरद्वारे वाहन तपासणी आता सोपी होणार आहे. या रोलर ब्रेक टेस्टिंग साठी रिक्षा चालक व अन्य वाहनांना दिवे घाटात जावे लागत होते. आधीच कोरोना महामारीमुळे रिक्षाचालक व छोटे वाहनधारक यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या प्रकल्पामुळे छोट्या वाहनधारकांचा वेळ, इंधन, व पैशांची निश्चितच बचत होणार असून त्याचा फायदा शहरातील सर्व रिक्षाचालक व छोटे वाहनधारकांना होणार आहे. या कामाबाबत मी RTO विभाग, PWD विभाग, पुणे मनपा यांचेबरोबर वारंवार बैठका घेत, कामाची प्रत्यक्ष पाहणी करत यशस्वी पाठपुरावा केला आणि आज या कामाचा शुभारंभ झाला याचा मला अतिशय आनंद वाटतो. मा. शिरोळे साहेबांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असून तो आज पूर्णत्वाकडे गेला याचा मला अभिमान आहे. मा. साहेबांनी नेहमीच सर्वसामन्य नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून समाजकार्य केले. आज त्यांचीच विचारधारा डोळ्यासमोर ठेवून मी समाजकार्य करत आहे. या प्रकल्पामध्ये RTO विभाग, PWD विभाग, पुणे मनपा तसेच रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस श्री. नितीनजी पवार यांनी उत्तम कार्य केले याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.यावेळी उपस्थित उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार, परिवहन मंत्री. मा.ना.श्री. अनिलजी परब, खासदार मा. गिरिशभाऊ बापट, मा. निलमताई गोरे, मा. सुनीलजी टिंगरे, मा. बाबा आढाव जी, आदी उपस्थित होते.
Add your gallery here