SPORTSMEN FELICITATION
March 17, 2016विक्रमी कार्याचा आणि वयाचा काहीच संबध नसतो हा विचार खरा करून दाखविणारा १६ वर्षांचा कु चिरायु पंकज कावडिया याने भारतातील निवडलेल्या २७० स्केटिंगपट्टू बरोबर गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविले आहे.
त्याने लक्ष्मणराव आपटे प्रशाला डेक्कन या शाळेत इयत्ता १० वी मध्ये शिकताना १२१ तास नॉनस्टॉप मॅरेथॉन पद्धतीने ३१५० कि मी स्केटिंग करत विक्रम प्रस्थापित केला याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
तसेच आमनगर बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग स्पोर्ट्सच्या वतीने १९ नोव्हेंबर २०१५ मध्ये आयोजित केलेल्या ” लार्जेस्ट रोलर स्केटिंग डान्स रुटिन ” या उपक्रमात रोलर स्केटिंग स्पोर्ट्सच्या वतीने देशभक्ती गीतावर १३ मिनिटे स्केटिंगवर नृत्य सादर केले याची नुकतीच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डला नोंद झाली आहे.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे की समाजात आपल्या आसपासच असे ऊर्जा देणारे किर्तीवंत व्यक्तिमत्व असतात. गरज आहे तर अशा किर्तीवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची. खासदार अनिल शिरोळेंच्या वतीने कु चिरायुचा सत्कार केला व स्वयंभु फाउंडेशनच्या वतीने २४ एप्रिलला आयोजित केलेल्या स्वयंभु श्री हया बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या निमित्ताने त्याचा जाहीर सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे